+91 22 6112 4800 / 5095 4700

Media Coverage

First Cochlear Implant Surgery Successful At Someya Medical College


मुंबई : मुंबईतील गोवंडी परिसरात राहणाऱ्या तीन वर्षाच्या मुलीवर यशस्वीरित्या काॅक्लिअर इम्प्लांट करण्यात आले आहे. के जे सोमैया रुग्णालय अॅण्ड रिसर्च सेंटरच्या ईएनटी विभागाने पहिल्यांदाच काॅक्लिअर इम्प्लांटच्या मोफत शस्त्रक्रियेनंतर एका छोट्या मुलीला ऐकू येण्यास शक्य होणार आहे.

या यशस्वी शस्त्रक्रियेनंतर ही मुलगी आता सर्व सामान्य आयुष्य जगू लागेल अशी आशा सोमैय्या रुग्णालयातर्फे व्यक्त करण्यात आली आहे. दरम्यान मूक बधिर मुलांवर लवकरात लवकर कॉक्लिअर इम्प्लांट शस्त्रक्रिया केल्यास चांगला प्रतिसाद मिळून मुल लवकर बोलू किंवा ऐकू शकते.  मात्र भारतात याबाबत अद्याप जनजागृती नसल्याने या शस्त्रक्रियेचे प्रमाण कमी आहे. कान-नाक-घसा विभागाचे प्रमुख आणि प्राध्यापक डॉ. दिनेश वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली ही शस्त्रक्रिया करण्यात आली. तर कॉक्लिअर शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉ. मिनेश जुवेकर यांनी शस्त्रक्रिया केली.
           FOR MORE CLICK HERE ! :- https://www.esakal.com/mumbai/first-cochlear-implant-surgery-successful-at-someya-medical-college-oj05

Need assistance?

Call us at +91 22 6112 4800 / 5095 4700

POST A QUERY GIVE FEEDBACK